नवरात्री निमित्ताने “भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन,१३३ रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मावळ मराठा न्युज -सीआय इंडिया ऑटोमॅटिक लि. भोसरी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,कामगार कल्याण केंद्र चाकण,यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्ताने “भव्य रक्तदान शिबीराचे भोसरीत आयोजित केले.  कार्यक्रमाचे उद्घघाटन प्लॅन्ट हेड निवृत्ती बच्छाव , मनुष्यबळ विभागप्रमुख बाळासाहेब पाटील ,दत्तात्रय पडवळ ,प्रशांत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. भोसरी येथील शिबीरामध्ये १३३ कामगारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण १५१ कामगार वर्गाने सहभाग नोंदवला. पुणे ब्लड बँक  हडपसरच्या रक्तपेढीचे तज्ञ डाॅक्टर स्नेहल गिरमकर यांनी रक्तदानाचे महत्व कामगार वर्गाला सांगितले. तसेच हिमोग्लोबीनची कमतरता या बाबतही मार्गदर्शन केले.सीआयई इंडीया गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वाॅच व प्रमाणपत्र तसेच ट्राॅफी देण्यात आली.  श्री.अविनाश राऊत केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र चाकण यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त कामगार वर्गाने घ्यावा असे आवाहन केले. यावेळी कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्राच्या यांच्या वतीने आस्थापना व संघटना यांना सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले.कामगार प्रतिनिधी दत्तात्रय धावडे,सुभाष जमादार,ज्ञानेश्वर कळमकर,.दिपक अरगडे व श्री.कृष्णदेव थोरात यांनी या शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व  मोलाचे सहकार्य गुणवंत कामगार शंकर नाणेकर,व आण्णा जोगदंड त्यांचे लाभले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर झाले, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक अविनाश राऊत  यांनी कामगार व अधिकारी वर्गाचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page