भगवंताचे नाव ज्यांच्या मुखात,ज्यांना देवाचे दर्शन होते,देवावर ज्यांचे प्रेम ते वैष्णव- ह.भ.प.माऊली महाराज कु-हाडे महाराज

मावळ मराठा न्यूज -वाकसई,ज्या जागी स्वतः संत तुकाराम महाराज यांनी व्यवसायानिमित्त विसावा घेतला त्या पावन झालेल्या जागी आपण दोन तास बसलो या पेक्षा मोठे भाग्य नाही असं सांगत कीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज कु-हाडे महाराज यांनी सांगितले. वैष्णव कोण सांगताना भगवंताचे नाव ज्यांच्या मुखात आहे ,चराचरात ज्यांना देवाचे दर्शन होते ते आणि देवावर ज्यांचे प्रेम आहे ते वैष्णव आहे. जीवाला जीवाची ओळख करून देण्याचे सामर्थ्य वैष्णवात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.वाकसई येथे जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज (झाड) पादुका स्थान सेवा ट्रस्ट व मासिक दिंडी समाज मावळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यात किर्तनात कु-हाडे महाराज यांनी उपस्थिताना वैष्णवांच्या हरीनामात चिंब केले.सप्ताहाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. सोमवार दि. १० मार्च २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च २०२५ पर्यंत हा सोहळा रंगणार आहे. जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज (झाड) पादुका स्थान सेवा ट्रस्ट वाकसई येथे सुरू असलेल्या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे.वाकसई येथे विठ्ठल नामाचा गजर अविवरत सुरू आहे. भरत ग. येवले अध्यक्ष, मिलींद द. बोत्रे उपाध्यक्ष, अमोल सु. केदारी सहसेक्रेटरी, मारुती भ. येवले, सुभाष द. पडवळ, बाळासाहेब शि. भानुसघरे, निवृत्ती पा. भानुसघरे, सहादु र.भानुसघरे, निवृत्ती पा. भानुसघरे, सहादु र. आहेर, जयवंत ज्ञा. ढाकोळ, विलास द. विकारी, आनंद पां. जोशी, नंदकुमार सोनु वाळंज (विश्वस्त), मारूती काशिनाथ येवले (विश्वस्त), मारूती रामभाऊ देशमुख (विश्वस्त), धोंडीबा बाळु केदारी (विश्वस्त), विजय अनंता शेलार (विश्वस्त), सुर्यकांत तु. जाधव मानद अध्यक्ष, बळवंत द. येवले सेक्रेटरी, रमेश देविशंकर व्यास (विश्वस्त), एकनाथ नारायण दळवी (विश्वस्त) अॅड. संजय शंकर बांद्रेविश्वस्त),(विश्वस्त), विलास भिकु बडेकर(विश्वस्त), सुभाष ज्ञानदेव भानुसघरेयांच्या सह अन्य भाविक किर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पौराणिक दाखले दिले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज,मुक्ताई आणि चांगदेव भेटीच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी सुंदर पोशाख परिधान करुन साकारलेल्या होत्या.फटाकांची आतशीबाजी करत गरुड स्वतः कीर्तनकार यांना पुष्पहार देतो हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते.यावेळी मावळ तालुक्यातील पत्रकार यांचा जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज (झाड) पादुका स्थान सेवा ट्रस्ट व मासिक दिंडी समाज मावळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page