नंदा तांदळे,यांना राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार प्रदान








मावळ मराठा न्युज -लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक सहाच्या आदर्श मुख्याध्यापिका नंदा तांदळे यांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार रविवारी दिनांक ७/१०/२०२५ रोजी सातारा येथे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते व राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यात अति उत्कृष्ट काम केलेले शिक्षक मुख्याध्यापक तंत्रस्नेही सक्षम महिला आदर्श, आदर्श शाळापुरस्कार यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळेस राज्यातील राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख स्थानिक अध्यक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष कारंडे राज्य महिला प्रतिनिधी साधना साळुंखे राज्य सरचिटणीस अरुण पवार राज्य उपाध्यक्ष किशोर पाडवी सर्व पदाधिकारी उपस्थित होते नंदा तांदळे यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर समाज माध्यमातून ती बातमी प्रसारित झाल्यानंतर VPS शाळेचा स्टाफ यांनी दखल घेऊन त्या शाळे ने एक प्रतिनिधी शिक्षक श्री रसाळ सर यांना पाठवून तांदळे मॅडम यांचे अभिनंदन केले तसेच मॅडमच्या काही मैत्रिणींनी, गावातील काही महिलांनी ही त्यांचे अभिनंदन केले.



