ब्लेसिंग फाऊंडेशन,स्वर्गचे अध्यात्मिक गुरू सौरव मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिकांचा लोणावळ्यात आनंद मेळा उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिवाळी निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दिनांक १७ ऑक्टोबर रोजी विरंगुळा केंद्रात आनंद मेळा संपन्न झाला.ब्लेसिंग फाऊंडेशन,स्वर्ग चे अध्यात्मिक गुरू सौरव मेहता व त्यांच्या पत्नी मेघा मेहता,अनाम प्रेम संस्थेच्या सारिका पाळेकर,संतोष पाळेकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सौरव मेहता,मेघा मेहता यांच्या वर पुष्प वृष्टी करून त्यांचे सर्व ज्येष्ठांकडून स्वागत करण्यात आले. सौरव मेहता यांनी ज्येष्ठांनी निस्वार्थ भावना दाखवून, कुठल्याही लोभात न अडकता सुखाने जीवन जगावे, वाद विवाद, भांडणं,राग राग न करता आनंदात आपले आयुष्य जगावे असे मत व्यक्त केले. सौरभ मेहता यांचा शाल, बुके देऊन सन्मान करण्यात आला. सौरव मेहता,त्यांची सुविद्य पत्नी मेघा मेहता यांच्या हस्ते आधार फाउंडेशन चे संस्थापक,अध्यक्ष प्रकाश पाठारे, डॉ सीमा शिंदे, डॉ संदीप डोबले,भरत वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. सर्व ज्येष्ठाना स्टील डब्यात फराळ देण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्वांना चहा बिस्कीट देण्यात आले. या वेळी मावळ नागरिक,एम एन न्यूज चे मुख्यसंपादक संजय पाटील,मावळ वार्ताचे उप संपादक प्रदीप वाडेकर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,उपाध्यक्ष मृदुला पाटील,खजिनदार गोरख चौधरी,संध्या गव्हले,सचिव रश्मी शिरसकर,सह सचिव रविंद्र कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page