आजपासून जोमाने कामाला लागणार,मावळचे आमदार सुनील शेळके आई एकविरेच्या दर्शनाला


मावळ मराठा न्यूज :- वेहरगाव( प्रतिनिधी नरेश बबन पवार)मावळ चे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आज अखंड महाराष्ट्राचे कुलैवत कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा अभिषेक करून सहकाऱ्यांसमवेत मनोभावे दर्शन घेतले.मावळच्या मायबाप जनतेनी विश्वासाने दिलेली जबाबदारी मी कर्तव्य समजून नेहमीच पार पाडत आलो आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन अशीच अखंडित सेवा माझ्याकडुन होत राहो अशी प्रार्थना आई एकविरेच्या चरणी केली. पुन्हा जोमाने सक्रिय होऊन प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आमदार शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या समवेत त्यांच्या सूविद्य पत्नी सारिका शेळके,दीपक हुलावळे,नारायण पाळेकर ,वेहेर गावच्या सरपंच अर्चना देवकर,बाळासाहेब भानुसघरे ,विश्वस्त मारुती देशमुख, कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे ,अमोल केदारी,अनिल माळपुटे ,गणेश थिटे,धनंजय काळोखे,नवनाथ देशमुख तानाजी पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.




