मी खानदानी पोरगी हाय” व्हिडिओ आल्बमचे प्रकाशन



मावळ मराठा न्यूज:-पिंपरी(प्रतिनिधी) भाग्यश्री फिल्म्स निर्मित मी खानदानी पोरगी हाय” या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन प्रसिद्ध गायक कल्याण गायकवाड यांच्या हस्ते पिंपरी येथे करण्यात आले.यावेळी स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडीत विद्यासागर,आयपीएस कॅंपसचे संचालक डॉ सुधाकर बोकेफोडे,निर्मात्या रेखा घोडे,दिग्दर्शक शिवाजी घोडे, बापू पवार आदी उपस्थित होते. यावेळी रेखा घोडे म्हणाल्या कि, यु ट्यूबवर गाण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही क्षणातच रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.यावेळी ” मी खानदानी पोरगी हाय” या गाण्याचे मुख्य अभिनेत्री धनश्री घोडे, मुख्य अभिनेता महेंद्र भांगे,गीतकार महेंद्र पाटोळे,गायिका पल्लवी घोडे,सहाय्यक दिग्दर्शक विकास इनामदार यांचे विशेष सत्कार करण्यात आले. संतोष वाघमारे, सोहेल मुल्ला,अजित पोतदार,मुकेश चौकेकर, रोहन खिलारे, पार्थ मेने, कृष्णा जावळे ,गणेश देवकर, महादेव हुंबऱे,वैभवी क्षीरसागर, सानिया पठाण, दिपाली धस, स्नेहा घोडे या सर्व सहकलाकार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकार मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा घोडे यांनी आणि रूपाली पवार यांनी तर आभार धनश्री घोडे हिने मानले.




