*लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, लोणावळा इंडस्ट्रियल इस्टेट व फ्रँको इंडियन फार्मा आणि मनशक्ती केंद्र यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर*

मावळ मराठा न्युज -लोणावळा, ६ ऑगस्ट २०२५ लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, लोणावळा इंडस्ट्रियल इस्टेट व फ्रँको इंडियन फार्मा आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शुभस्पर्श दवाखाना, नांगरगाव इंडस्ट्रियल इस्टेट, लोणावळा येथे यशस्वीरीत्या पार पडले.या शिबिरात मधुमेह तपासणी सुमारे ३०० लोकांचे,युरिक अ‍ॅसिड तपासणी सुमारे ३०० लोकांचे, तसेच धनुर्वात प्रतिबंधक लस (टिटॅनस इंजेक्शन) सुमारे ४५० नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला कांता ओसवाल (अध्यक्षा) अश्विनी कदम (कोषाध्यक्ष) डॉ. पोपट ओसवाल डॉ. दिलीप सुराणा डॉ. लीना पॉन आशिष पॉन देवेंद्र नाळेकर मंगेश कदम ॲड. प्रफुल लुंकड विरल गाला अभय जैन रोहित थोरात एम.जे.एफ. लायन देवल पोरख (Zone Chairman) मनशक्ती केंद्र लोनावाला कडून डॉ. गोसावी शांती ताई पुरब नंदकिशोर खांडेवाल यांनी मौलाचे सहकार्य केले फ्रँको इंडियन फार्मा कडून अवधूत जोशी LICEL कार्यालयातून डॉ. संतोष निंकलजे पतंगे मॅडम (Vice Chairman) देवराम लोखंडे दत्ता राणे (LICEL मॅनेजर) नितीन दुर्गे प्रविण खिलारे मयूर डाळवी प्रविण झुरांगे (Alex Grinder) श्री. संदीप कोराड – अध्यक्ष, LICEL यांचे, या शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली. तसेच नवरत्न चिक्की गिरीश पारख यांचे मार्फत चिक्की व पाण्याची व्यवस्था करण्यात आली या शिबिरामुळे आरोग्य विषयक जनजागृती वाढवण्यात मदत झाली आणि स्थानिक नागरिक व कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. लायन्स क्लबचा हा उपक्रम भविष्यातही असेच चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page