थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९७ जयंती आम्ही खोपोलीकर यांनी केली साजरी विविध उपक्रमानी

मावळ मराठा न्युज :- खोपोली, ११ एप्रिल थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९७ जयंती निमित्त आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ( शिळफाटा ) इथे ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर भुजबळ तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. मोहन विठ्ठल केदार ह्यांनी पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तसेच क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला सो. ज्योती भुजबळ तसेच श्री. गणेश ठाकरे यांनी पुष्पहार घालून रथयात्रेची सुरवात केली. शिळफाटा श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली पर्यंत रथयात्रा काढून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे श्री प्रदीप मोरे व सुरेखा ताई खेडकर ह्यांनी पुष्पहार अर्पण करून आम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन सांगता केली. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले ह्यांच्या बद्दल बोलताना श्रीमती सुरेखा ताई खेडकर ह्यांनी आपल्या सर्वांच्या जडणघडनेत त्यांचे खूप मोठे मोलाचे कार्य आहे व आपण ह्या महापुरुषांना विसरलो आहोत अशी शोकांतिका बोलून दाखवली. महात्मा फुले ह्यांनी सावित्री बाई फुले ह्यांना बरोबर घेऊन महिलांसाठी केलेले कार्य व आज इथे सर्व पुरुष उपस्थित असताना सुद्धा एक स्त्री म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच. आज महिलांना शिकवले शिक्षित केले म्हणुच सर्वत्र सर्व ठिकाणी महिला कार्येरत आहेत व राजकारणात ही आज राष्ट्रपती पदी नियुक्त आहेत. समाजाला जातिव्यतेतून, स्त्री-पुरुष भेदभाव, वर्णभेद यासारख्या जुन्या चालीरीती मोडीत काढून समाजामध्ये क्रांती घडवून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक मोलाचे कार्य केले.दिनकर भुजबळ यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य अनमोल आहे. त्यांनी ज्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सत्याची बाजू घेऊन परखडपणे काम केले. त्यांच्या कामाचे मोल त्यावेळी करणारी मंडळी कमीच होती. आजही त्यांचा संघर्ष संपलेला नाही. कारण सत्य हे कटू असते ते पचवणे व्यवस्थेला सहजासहजी पचनी पडत नाही. ज्यांच्या करीता काम केले.त्यांनाच विसरपडला की काय असा प्रश्न निर्माण केला. तरीसुद्धा आपण त्याचे कार्य समजा समोर निर्भय पणे मांडले पाहिजे. महात्मा फुले यांचे कार्य डोळ्या समोर ठेऊन आपण सर्वांनी काम केले पाहिजे. श्री. प्रदीप मोरे ह्यांनी आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व अश्या ह्या थोर समाजसुधारक महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्यांचे विचार आदर्श आस्मसात करून सर्वांनी जयंती साजरी केली पाहिजे असे सांगितले. आचासहिता असताना सुद्धा ऐनवेळी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी साहेब तसेच खोपोली पोलिस स्टेशन मार्फत श्री. राऊत साहेब व श्री. सतीश बांगर साहेब श्री. खरात साहेब यांनी परवानगी दिली मिरवणुकीत श्री. सोनावणे साहेब यांनी सुरवातीपासून शेवट पर्यंत बरोबर राहून मोलाचे सहकार्य केले तसेच सर्वांनी कार्यक्रमासाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना ही दील्या ट्रॅफिक जाम, ध्वनी प्रदुषण व इतर कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्या देताना अश्या ह्या सर्व महापुर्षांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन काम करा हे ही सांगितले त्या बद्दल त्यांचे तसेच केलेले सहकार्य त्यासाठी मनापासून आभार मानले, शाहिद शफी शेख, इरफान शफी शेख – मिरवणूक साठी रथ दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानन्यात आले. सदर कार्यक्रमासाठी श्री. मोहन विठ्ठल केदार, ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर भुजबळ, श्रीमती सुरेखा ताई खेडकर, सो. ज्योती भुजबळ, श्री. प्रदीप मोरे, श्री. गणेश ठाकरे, श्री. गणेश राक्षे, कु. सोहन साखरे, कु. अक्षय सकपाळ, श्री. इरफान शफी शेख, श्री. प्रमोद गाकवाड, श्री. महेंद्र ओव्हाळ, श्री. निलेश मोडवे, श्री. महेश काजळे उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page