रोटरी क्लब ऑफ लोणावळा व चाइल्ड वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फराळ व साडी वाटप








मावळ मराठा न्युज-लोणावळा,दिवाळी फराळ व साडी वाटप दिवाळीचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लोणावळा व चाइल्ड वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुना खंडाळा येथील ठाकर वस्तीवर दिनांक २१ ऑक्टोबर २५ रोजी दिवाळीच्या फराळाचे वाटप व साडी वाटप करण्यात आले.वीस कुटुंबांच्या प्रतिनिधींना हे वाटप करण्यात आले.
रोटरीच्या नूतन अध्यक्षा सौ विजया कल्याण माजी प्रेसिडेंट रवींद्र कुलकर्णी, नितीन कल्याण, जयवंत नलवडे,नारायण शारवाले,सेक्रेटरी कॉन्ट्रॅक्टर मुस्तफा,ला. व चाइल्ड वर्ल्ड फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सबरीना कूपर व सामाजिक कार्यकर्ता संतोष खंडाले हेही उपस्थित होते. मिठाई व साडी मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.



