*सुभाषित गंध यां पुस्तकाचे विमोचना सोबत संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना संत तुकाराम महाराज साहित्य भूषण पुरस्कार २०२६*






मावळ मराठा न्युज- प्रतिनिधी, *सुभाषित गंध यां पुस्तकाचे विमोचना सोबत संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना संत तुकाराम महाराज साहित्य भूषण पुरस्कार २०२६ यां पुरस्काराने आळंदीत सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित मुंबई, दशरथ धायगुडे पुणे , श्री विलास पाटील कोल्हापूर यांचे हस्ते जल्लोष्यात बहाल केला गेला* रविवार दि २३/८/२०२६ रोजी के एस आय पब्लिकेशन कोल्हापूरच्या आयोजक श्री कवी श्री विलास पाटील इंगळी यांचे वतीने घेतलेल्या ३० व्या ग्रामीण कवी संमेलनात संमेलनाध्यक्षपदी श्री दशरथ धायगुडे,उदघाटक श्री दिपक पवार, प्रमुख पाहुणे श्रीमती वाणी वेणूमाधव केरकलंपट्टी यांचेसह श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर , यांचे हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न झाले. स्वागताध्यक्ष प्रा. सी ए डॉ शंकर घनशामदास अंदाणी यांचे हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागतं झाले. कवी संमेलनास प्रमुख पाहुणे लाभलेल्या बालिवूड सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित,यांचा लावणी डान्सने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तर बहारदार सूत्र संचानक करणाऱ्या सिने अभिनेत्री सुनीता क्षीरसागर यांनी आपल्या आगळ्याशैलीत सदाबहार सूत्रसंचालन केले तसेच वासुदेवाची स्वारी येताच त्यांनी प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली ११:००अनेक मान्यवरांची पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला *सुभाषित गंध* यां संस्कृत ग्रंथासोबत त्यात अनेकांची पुस्तके प्रकाशित झाली तर कवी संमेलनात अनेकांच्या काव्य श्रावण सरीनी रंगत आणली व संतदास पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी पर्यवरण आणि इंद्रायणीसाठी शपथ स्वच्छतेची देताच यां काव्याने बहारदार शैलीत सादर करतांना प्रेक्षकांनी मोठ्या आनंदाच्या जल्लोषात टाळ्यांनी गडगडाटाने एक वेगळीच कार्यक्रमात रंगत आणली. तसेच अनेक मान्यवरांना संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई तर काहींना संत तुकाराम महाराज आदी करून संतांच्ये नावे पुरस्कारीत करून के एस आय पब्लिकेशने कवी लेखक व्याख्याते आणि ,रसिकांच्या मनात घर केले. तसेच कार्यक्रम संपताच संतदास श्री पुरुषोत्तम महाराज यांनी आपले श्रीगुरु शांतिब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर यांचे शाल व पुष्पहाराने स्वागतपूर्ण संस्कृत मध्ये असलेला *सुभाषित गंध* हा ग्रंथ चरणी अर्पण केला.



