सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराचा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघीरे पाटील यांना सक्रिय जाहीर पाठिंबा.

मावळ मराठा न्युज :- पिंपरी, प्रतिनिधी,मोठ्या जिद्दीने देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.मुखमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरद पवार साहेब, नानासाहेब पटोले यांच्या प्रामाणिक प्रयत्नाना यश मिळवुन देण्यासाठी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराचा मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघीरे पाटील यांना जाहीर पाठिंबा चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास संजोग वाघीरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.दरम्यान सकल मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी सक्रिय जाहीर पाठींबा दिला.दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघात मातंग समाजाचा जो सन्मान करेल त्यांच्या सोबत मातंग समाज असेल असं मत समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे यांनी व्यक्त केले.यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, सा. लो. डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, विशाल कसबे,पैलवान विठ्ठल शिंदे, अविनाश शिंदे,आबासाहेब मांढरे, मनोज डाखोरे, अनिल तांबे, वसंत वावरे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page