मी स्वतः नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवणार – सूर्यकांत वाघमारे

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगर पालिकेची निवडणुक लवकरच होणार आहे नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती साठी आरक्षित आहे त्या करिता अनेकांनी ईच्छा व्यक्त केली आहे निवडणुक लढविणे,ईच्छा व्यक्त करणे हा संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यामुळे त्यांचे मनापासून स्वागत. इच्छुकांची संख्या उंदड असल्याने संपूर्ण शहरात भेटी गाठीचे सत्र चालू आहे. पंधरा वीस उमेदवार शहरातील नागरिकांच्या भेटी गाठी घेत असल्याने शहरातील नागरिक पण त्रस्त आहेत. मी स्वता नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवणार आहे परंतु अद्याप राजकिय चित्र अस्पष्ट असल्याने नागरिकांना भेटून त्रास देऊ नये म्हणून मी अजून शहरात भेटीगाठी सुरु केलेल्या नाहीत त्यामुळे गैरसमज नसावा हि विनंती. उमेदवारी महायुती आघाडी महाविकास आघाडी किंवा स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय झाला कि मी लोणावळे करांचा आशिर्वाद घ्यायला निश्चित येणार आहे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत म्हणण्या पेक्षा मी नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविणार हे निश्चित आहे माझ्या सार्वजनिक राजकीय जीवनात लोणवळेकरांनी भरपूर साथ दिली अशीच साथ भविष्यात मिळावी हि प्रार्थना. मी कालपण लोणावळयाकरा सोबत होतो आज ही लोणावळेकरा सोबत आहे व उद्या ही लोणावळेकरा सोबत राहील हा माझा शब्द आहे वचन आहे ! उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी .शहरात बॅनर लावून शहर विदृप होणार नाही याची दक्षता घेऊनच मी ईच्छुक उमेदवार म्हणून बॅनर लावले नाहीत तरी आपण मला योग्य ते सहकार्य कराल हिच अपेक्षा प्रदेश सचिव आरपीआय (आठवले) मा. नगराध्यक्ष लोनपा मा. सदस्य पूणे जिल्हा नियोजन समिती मा . सभापती शिक्षण मंडळ लोनपासूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page