टायगर पॉईंट,लायन्स पॉईंट बनत आहेत नशापान करण्याची अड्डे ,स्थानिक तरुण तरुणी यांना यापासून वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहरात मागील काही दिवसात वाढलेली गुन्हेगारी यात सकाळी मॉर्निंग वॉल्क करणाऱ्या जेष्ष्ठ महिलेची चैन ओढणारे चोर असो, दिवसा ढवळ्या भांगरवाडीतील तेलंग परिवाराच्या राहत्या घरातून ९ ते १० तोळे सोने कपाट उचकटून केलेली चोरी असो, लहान बालिकेचे अपहरणचा प्रयत्न,शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस लोणावळेकरांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास,तसेच लोणावळा शहरात जड अवजड वाहनांना बंदी असून त्याकडे पोलिसांनी जाणीव पूर्वक केलेले दुर्लक्ष, त्यामुळे होणाऱ्या अपघातात जाणारे जीव, ही लोणावळेकरांसाठी मोठी समस्या आहेच.पण त्याहून चिंताजनक बाब म्हणजे आपल्या टायगर पॉईंट,लायन पॉईंट या परिसरात नशा केंद्र बनत चालली आहेत. मुंबई हुन मौज मस्ती साठी येणारे पर्यटक हे जरी नशा पाणी करत असले तरी याचा फटका आपल्या येथील स्थानिक तरुणांना जास्त बसण्याची शक्यता वाढली आहे. याकडे जागृत आणि जागरूक नागरिकांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासन असो वा पालिका प्रशासन हे दोन तीन वर्षे राहून निघून जातील परंतु स्थानिकांनी ग्रामीण आणि शहरी परिसरात फोफावत असणाऱ्या नशा केंद्रावर वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लोणावळा उपविभागाचे सहायक अधीक्षक,आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी याकडे नशामुक्ती कडे फोकस केले असले तरी त्यांच्यावर देखील मर्यादा आहेत.मनुष्याबळाचा अभाव,पोलिसिंग यंत्रणाची कमतरता यामुळे त्यांचे प्रयत्न कमी पडत आहे. ही नशामुक्तीची कीड फक्त पोलिसांचीच जबाबदारी नसून त्यासाठी स्थानिक,जागृत नागरिकांनी याकडे गांभीर्याने बघण्याची ही वेळ आहे. नाहीतर नशापानाच्या व्यसनमुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होतील.त्यामुळे याकडे लोणावळेकर नागरिकांनी पोलीस यंत्रणेच्या मदतीने संपूर्ण निपटारा केला पाहिजे.विशेष करून महिलांच्या बाबतीत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर देखील लोणावळा नगरपरिषदच्या माजी नगरसेविका सौ. ब्रिंदा गणात्रा यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन,लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच लोणावळा नगरपरिषदेला तत्काळ कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.या निवेदनाद्वारे मांडलेले काही ठळक मुद्दे यात १. शहराच्या विविध भागात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.२. शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढवण्यात यावी.३. महिलांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.४. शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेले सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही याची खात्री करावी आणि त्याचे वेळोवेळी ऑडिट करण्यात यावे.५. अटक झालेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.६. महिला संरक्षणासाठी शहरात जनजागृती करण्यात यावी. याकडे नागरिक,पोलीस प्रशासन आणि लोणावळा नगरपरिषद प्रशासन असे सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.पोलिसांनी देखील काही सुमोटो ऍक्शन घेणे गरजेचे आहे. गुन्हा घडल्यावर कारवाई करणं एवढेच काम पोलिसांचे नसून तों गुन्हा घडूच नये यावर जास्त भर पोलिसांनी दिला पाहिजे. रात्रीच्या वेळी टायगर पॉईंट, लायन पॉईंट परिसरात कोणाचेही नियंत्रण नाही. या परिसरात सर्रास नशा करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी जेणेकरून पुढील पिढी यापासून वाचू शकेल. यात पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. हा संवेदनशील विषय असल्याने सामाजिक हिताचे संरक्षण पोलिसानी करावे एवढेच.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page