युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना..दहावीच्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे मोफत मार्गदर्शन

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२४ लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार असून यावेळी मोफत सराव प्रश्नसंच देण्यात येतील. विद्यार्थ्यांमधील उपजत गुण आणि गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी यादृष्टीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सुमारे ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संयोजकांचा मानस आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एमजेएफ ला. प्रदीप कुलकर्णी (९८५०५००४३६), ॲडिशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ला. उज्ज्वला कुलकर्णी (९८२२४५०७५०) किंवा समन्वयक ला. अनुजा करवाडे (९७६६५३९८०९) यांच्याशी संपर्क साधावा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page