लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने तळेगाव येथे अन्न धान्य आणि कपड्यांचे वाटप

मावळ मराठा न्युज – तळेगाव, तळेगाव दाभाडे येथील तपोवन कॉलनीतील संजीवनी मुलींचे वसतिगृह येथे विद्यार्थिनींच्या कल्याणासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत वसतिगृहातील विद्यार्थिनींना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थिनींना दिलेल्या या मदतीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजांची पूर्तता होऊन त्यांना प्रोत्साहन मिळाले.या उपक्रमाचे नेतृत्व लायन नंदकिशोर खंडेलवाल यांनी केले. तसेच लायन्स क्लब अध्यक्षा लायन कांताबाई ओसवाल, लायन दीप्ती लुनावत, डॉ. पोपट ओसवाल, डॉ. सुहास गोसावी, सामाजिक कार्यकर्त्या शांती परब, अनुराधा कॉन्ट्रॅक्टर, श्री व सौ. काऊर सुधीर रिलकर, श्री देशकर, अभय जैन आणि इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमातून लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांची समाजसेवेबद्दलची बांधिलकी आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली तत्परता अधोरेखित झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page