इंद्रायणी,पवना,मुळा नद्या प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा- लोकसेवक युवराज दाखले .

मावळ मराठा न्यूज़ :- पिंपरी, -प्रतिनीधी,मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. मावळात या उगम पावलेल्या नद्या शहरातच्या प्रवेशद्वारापर्यंत बर्यापैकी स्वच्छ निर्मळ असतात. मात्र शहरात आल्यानंतर या पवित्र नद्यांचे अक्षरशः गटारी बनवण्याचे पाप पिंपरी चिंचवड शहरातील राज्यकर्ते,प्रशासन व बेजबदार उद्योजक यांनी मिळून केले आहे. पवना नदी केजुबाई बंधारा ते चिंचवडगाव पर्यंत या पावसाळ्यापासून रासायनिक मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळणे, नदीतील मासे मरणे हे प्रकार पाच वेळा घडले आहेत. किवळे,पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडी अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून सुमारे २५ किलोमीटर वाहते. तसेच इंद्रायणी नदी देखील पिंपरी चिंचवड शहरातून वाहते. या नद्यांमध्ये अनेक उद्योगपती त्यांच्या कारखान्याचे रासायनिक मिश्रित पाणी, अनेक सोसायटी आपारमेंट नागरी वस्तीतून मैलामिश्रित पाणी सोडून वर्षानुवर्ष नद्या प्रदूषित केल्या जातात. या नद्यांमध्ये अनेक बांधकाम व्यवसायिक राडाराडा भरून नदीपात्र लहान करुन या जागेवरती प्लॉटिंग करून या जागा गोरगरीब नागरिकांना विकतात. या नदीपात्रात दरवर्षी जलपर्णी पूर्ण वाढून दिली जाते, मग कोट्यावधीचे टेंडर काढले जाते कागदाला कागद जोडून कोट्यवधीची बिले संगणमत करून काढले जातात. मात्र जलपर्णी ठेकेदाराला पूर्णपणे कधीच साफ होत नाही. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहिली जाते. आणि करदात्या नागरिकांचे पैसे लाटले जातात. केंद्र सरकार राज्य सरकार व महापालिकेच्या वतीने नदीच्या सुशोभीकरणाचे कोट्यावधीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्याऐवजी नदी सुधारणा, मैला शुद्धीकरण प्रकल्प व नदीवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी तसेच रासायनिक, मैलामिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्या व इतर ठिकाणाच्या उगमापर्यंत आपण व आपल्या प्रशासनाने एसी कार्यालयातून बाहेर पडून शहरातील संपूर्ण नद्यांचे, नाल्यांचे सर्वेक्षण करून या नद्यांमध्ये रसायनिक मिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्या, मैला मिश्रित पाणी सोडणाऱ्या सोसायटी,आपारमेंट व नदीपात्रात राडाराडा टाकणारे बांधकाम व्यवसायिक, नदीपात्रात प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करणारे लँड माफिया यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करावी. जर आपण ही कारवाई तात्काळ केली नाही तर आपण हि यामध्ये सामील आहात असे समजून आपल्यावर देखील आम्ही शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज तसेच अखिल भारतीय गौरक्षा परिषदेच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करू कृपया याची नोंद घ्यावी असा इशारा दाखले यांनी इमेल द्वारे दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page