लोणावळ्यात २ दिवसाच्या अभ्रकाला निर्दयी अज्ञात व्यक्तीने मृत अवस्थेत झाडाझुडपात फेकलेशहर पोलिसात गुन्हा दाखल







मावळ मराठा न्युज – लोणावळा,तारीख २९/०३/२०२६ रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास जुने पुणे मुंबई हायवे रोडचे कडेला वलवण तळ्याच्या बाजुला फिर्यादी यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो क्र. MH 12 VT 4062 यामध्ये भांडी विक्री करत जात असताना फिर्यादी नाव पत्ता अनिल रामचंद्र पत्तार वय ३२ वर्षे व्यवसाय प्लॅस्टीक भाडी विक्री रा. आळंदी रोड, फुले नगर आरटीओ ऑफीस शेजारी, मनोरुग्न दवाखाना बाजुला यांना लघवी करीता रोडच्या कडेली थांबले त्यावेळी तळ्याच्या बाजुला झुडपाच्या आडोश्याला लघवी करीता गेले असता त्या ठिकाणी झुडपाच्या बुंद्या जवळ एक लहान बाळ वय अंदाजे १ ते २ दिवस हे मृत अवस्थेत कपड्यामध्ये गुडाळलेल्या स्थितीत, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपत्य जन्माची लपवनुक करुन मृत देहाची गुप्त पणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यास अज्ञात स्थळी आणुन टाकले आहे दाखल गुन्ह्याचा पुढिल तपास मा. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे सो यांचे आदेशान्वये पोसई केरुरकर हे करीत आहे. दाखल अंमलदार पोहवा चाकणे / १७३९



