लोणावळ्यात उर्दू शाळा क्र ३ येथे ११ नोव्हेबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा








मावळ मराठा न्युज – लोणावळा,थोर स्वातंत्र्य सैनिक आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती लोणावळा उर्दू शाळा क्र ३ येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष -मुस्लीम को.ऑप. बँक.चे संचालक जाकिर खलिफा म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये नितीन गायकवाड, आनंद क्षिरसागर,दिलावर शेख, इम्तियाज अत्तार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक सईद नल्ला मंदू यांनी केले. आभार प्रा. मुख्याध्यापक लत्तिम खान यांनी केले.



