लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या पदाधिकारी यांनी संवाद स्कूलच्या विशेष मुलांबरोबर केली साजरी








मावळ मराठा न्युज- लोणावळा, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लेन राजेशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली टीम लोणावळा सुप्रीम्स यांनी गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संवाद स्कूल-लोणावळा येथील मानसिक दृष्ट्या अपंग विशेष मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या विशेष मुलांना दिवाळी फराळ आणि दुपारचे जेवण देण्यात आले. क्लब अध्यक्ष पीएमजेएफ ला. सुरैया वाडीवाला आणि एमजेएफ ला. सुधीर जी कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) यांनी संयुक्तपणे सदर कार्यक्रम प्रायोजित केला. दिवाळी साजरी करण्यासाठी केक कटिंग समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता आणि मुलांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आला.संवाद स्कूलच्या प्रत्येक मुलाला आणि कर्मचाऱ्यांना बदाम आणि ड्रायफ्रूट बिस्किटांचे पॅकेट देण्यात आले.या दिवाळी उत्सवाच्या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमजच्या सेक्रेटरी रंजना पुट्टोल,ला. छाया वर्तक क्लब कोषाध्यक्ष, ला. पल्लवी शेट्टी,ला. विश्वनाथ पुट्टोल, ला. छाया माळी आणि ला. यशश्री तावरे,अपंग मुलांसाठी हा उपक्रम एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) आणि एमजेएफ ला. सुधीर कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) यांनी समन्वयित केला होता.



