पुणे पुस्तक महोत्सवाचा तिसरा दिवस हा वैचारिक सोमवार पर्वणी देणारा ठरला

मावळ मराठा न्युज:-कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर त्याच्या नियोजनापासुन तर तो पुर्ण होण्यापर्यंत असंख्य ज्ञात, अज्ञात असे अदृश्य हात यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात, आणि यातूनच तो उपक्रम आकाराला येतो. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ च्या निमित्ताने अशाच सर्वांच्या साथीने ३ विश्वविक्रम साकारले गेले आहेत. पुणे पुस्तक महोत्सव संयोजक म्हणून जरी राजेश पांडे समोर दिसत असले तरी असंख्य हात त्याच्या मागे झटत होते. या सर्वांच्या सहकार्याने आणि सामूहिक प्रयत्नांतून या आविष्काराची अनुभूती मिळाली आहे. त्या सर्वाचे पांडे यांनी आभार मानलेत आणि सर्वांची अशीच साथ या पुढेही लाभो अशी ईच्छा व्यक्त केली.पुणे,सकाळच्या सत्रात स्टोरी टेलिंग सेशन मध्ये नवीन पिढी रंगून गेली. पूर्ती ने केलेली सुरुवात आणि मंजुश्री ने केलेला गोड शेवट लहान मुलांना गुंगवून ठेवणारा ठरला. दुपारी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महोत्सवात सहभागी होत अनेक स्टॉल्सला भेट देत तरुण आणि इतर लोकांशी संवाद साधला. यानंतर कुमार विश्वास यांचे सेशन तर त्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच रंगले. अत्यंत संवेदशील पद्धतीने तरुण पिढीशी आपल्या खास शैलीत संवाद साधणारे विश्वास यांचे सत्र म्हणजे शब्दांची मैफिल ठरली. तर lallantop या लोकप्रिय चॅनल चे संपादक सौरभ द्विवेदी यांनी आपल्या खास शैलीत अनेक मुद्द्यांवर कार्यकारण भाव स्पष्ट करत भाष्य करतानाच विचार करायला भाग पाडले. संध्याकाळच्या सत्रात इतिहासकार विक्रम संपत यांच्याशी अमित परांजपे यांनी संवाद साधला. या सत्रानंतर प्रत्येकालाच भारताच्या इतिहासाबद्दल उत्सुकता निर्माण होत संशोधन करण्याची इच्छा झाली नसेल तरच नवल.दिवसाचा शेवट होताना काश्मिरी गीतांवर नृत्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर कोमेडियन योगेश सुपेकर यांचा मीमीक्री कार्यक्रम पार पडला.अशी माहिती आयोजक राजेश पांडे यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page