लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांवरील कथाकथन स्पर्धा संपन्न








मावळ मराठा न्युज – लोणावळा,१२ ऑक्टोबर २०२५ रोजी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज टीमने छत्रपती शिवाजी महाराजांवरील कथाकथन स्पर्धेसाठी प्रायोजित बक्षिसे दिली. श्रीया सचिन रहाळकर यांनी आयोजित केली.लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोस आणि राष्ट् सेविका संघ यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम आणि बक्षिस वितरण समारंभ अॅड बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. लोणावळा सुप्रीमोस यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १०० मुलांना न्यूट्रिशन बार देखील वाटले. बक्षिसे आणि न्यूट्रिशन बार क्लब अध्यक्षा पीएमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केले आणि हा उपक्रम लायन विश्वनाथ पुट्टोल यांनी समन्वयित केला. या उपक्रमासाठी उपस्थित ला. रंजना पुट्टोल (क्लब सेक्रेटरी)..ला. छाया वर्तक (क्लब कोषाध्यक्ष),ला. पल्लवी शेट्टी,ला.छाया माळी,एमजेएफ ला. सुधीर कदम (डीसी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन),एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग). आदी मान्यवर उपस्थित होते.



