लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडी कडून कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन आणि निषेध







मावळ मराठा न्युज – लोणावळा कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष.श्रद्धेय एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे लोणावळा शहरात लोकेश भडकवाड लोणावळा शहर अध्यक्ष आणि कमिटी,आणि संगीता अवचर महिला अध्यक्षा लोणावळा शहर आणि कमिटी आयोजित आणि पुणे पश्चिम जिल्हा अध्यक्ष संतोष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली,पुणे जिल्हा निरीक्षक उत्तम वनशिव व पुणे जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्षा नितीन ओव्हाळ,आणि तालुका कमिटी,संदीप कदम युवा तालुका अध्यक्ष आणि कमिटी,भारतीय बौद्ध महासभा,तसेच समता सैनिक दल,संजय कुलकर्णी माथाडी ट्रान्सपोर्ट मावळ तालुका अध्यक्ष आणि दत्ता शिंदे कमिटी, वृशाली ताई वीरगुजार महिला तालुका अध्यक्ष आणि कमिटी यांच्या उपस्थितीत पार पडला.या वेळी किचन बॉक्सर वाचाळ वीर evm डबड्यातून निवडूण आलेल्या बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याचाही निषेध करण्यात आला.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेल्या भोंदू बागेश्वर याचा ही निषेध करण्यात आला.हा सामूहिक वाचन कार्यक्रमाची पार्श्वभूमी लोकेश भडकवाड यांनी सांगितली आणि शेवट आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन पुणे जिल्हा सचिव अरुण कांबळे यांनी केले आणि त्या बरोबर प्रबोधन कार सागर वाघमारे तसेच सर्व उपस्थित जिल्हा,तालुका शहर पदाधिकारी यांनी पुस्तकातील संदर्भ देऊन मार्गदर्शन केले.*शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचनात संजय कांबळे कार्याध्यक्ष लो.शहर भरत गुप्ते पुणे जि.संपर्क प्रमुख,कैलास मोरे ता.उपाध्यक्ष,शशिकांत शिंदे,शकील बागवान पुणे जि.उपाध्यक्ष,रोहन कांबळे,संपर्क प्रमुख लो.शहर विशाल गायकवाड प्रवक्ते लो.शहर,अमित देसाई,रोहन गायकवाड,अभिजित धांडोरे वडगाव शहराचे उपाध्यक्ष पवन राजे उदागे विठ्ठल ओव्हाळ मेजर वंजारी ज्येष्ठ नेते किसन गायकवाड अनिल गायकवाड त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी मावळ तसेच.*मीरा ताई मापारे,नीता ताई गायकवाड, शिल्पा गायकवाड,अमृता रोकडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.



