पांगोळी लव्हाळ-वाडी लोणावळा येथे “मनशक्ति प्रयोग केंद्र-लोणावळा”यांच्यावतीने दिंडीतील वारकर्यांची आरोग्य तपासणी









मावळ मराठा न्युज -दिनांक सोमवार ,दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी पांगोळी लव्हाळ-वाडी लोणावळा येथे “श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था ( संस्थापक ह.भ.प. गुरूवर्य वामन महाराज भोईर ) ” यांची, कोकण प्रांत (रायगड- खालापूर/पनवेल/पेण /कर्जत) ते श्री क्षेत्र आळंदी येथे जाणारी पायी दिंडी भजन किर्तन व निवासासाठी उतरली होती,
“मनशक्ति प्रयोग केंद्र- लोणावळा” यांच्या वतीने सदर दिंडीच्या वारकर्यांना संध्याकाळी विनामूल्य आरोग्य तपासणी व औषध उपचार सेवा देण्यात आली. त्या साठी डॉक्टर गिरवले, श्री नंदकिशोर खंडेलवाल, सिस्टर कु. शांति ताई परब , कु. चेतना सामंत, श्री. राम वाळुकर , श्री. आदित्य गोंधळेकर , डॉ. सुहास गोसावी ईत्यादी सेवेसाठी उपस्थित होते. पायी दिंडीच्या सुमारे ४२ प्रौढ बंधू -भगिनी यांनी आरोग्य सेवेचा लाभ मिळाला.
पांगोळी येथील लव्हाळ-वाडी लोणावळा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन बोके साहेब व ग्रामस्थ सहकार्यांच्या पुढाकाराने व सहकार्याने सदर सेवा उपक्रम पार पडला



