मावळ तालुक्याचे वैभव पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले त्या निमित्त मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जल पूजन

मावळ मराठा न्यूज़ :-पवना नगर , मावळ तालुक्याचे वैभव, शेतकरी कुटुंबाची आई,मावळ तालुका पिंपरी चिंचवड महा नगराची तहान भागवण्यासाठी सदैव तयार असणारी पवनामाई चे उगमस्थान पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे . त्यानिमत्त आज मावळ तालुका शिवसेने च्या वतीने जल पूजन संपन्न झाले तसेच पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या वृक्ष पंधरवडा कार्यक्रमामध्ये पवनानगर येथे वृक्षरोपण करण्यात आले. ह्या मंगल प्रसंगी पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख श्री मच्छिंद्रजी खराडे, माजी उप जिल्हाप्रमुख श्री भारत ठाकूर,मावळ तालुका संघटक श्री शांताराम भोते, पवना नगर शहर प्रमुख श्री सुरेश गुप्ता,माजी सरपंच श्री अनिल भालेराव,शाखा प्रमुख श्री उमेश ठाकर,सौ प्रिया उमेश ठाकर,उप सरपंच श्री शामबाबू वाल्मिकी,श्री इंद्रजीत तिवारी, अविनाश शिंदे,श्री सुनिल इंगुळकर, तुषार घाग,राहुल जव्हेरी,संतोष कालेकर,प्रवीण कालेकर ,नरेश घोलप सोमनाथ कचरे,अक्षय कालेकर,दत्ता दाभाडे पवन मावळ प्रसिध्दी प्रमुख श्री किशोर शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page