झोन तीन डीसीपी डॉ. शिवाजीराव पवार यांचा चऱ्होली बुद्रुक ग्रामस्थ्यांचा वतीने सन्मान



मावळ मराठा न्युज -आळंदी,(अर्जुन मेदनकर) पुणे जिल्ह्यातील बहुळ व चिंचोशी गावामध्ये दरोडा घातलेल्या दरोडेखोरांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त झोन ३ चे डीसीपी डॉ श्री शिवाजीराव पवार व त्यांचे सहकारी पोलिस अधिकारी/कर्मचारी यांनी अटक करुन कौतुकास्पद अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान चऱ्होली बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला . यावेळी खडकी बार असोशिएनचे मा. अध्यक्ष ॲड. सुनिल झपे, चेअरमन सुरेशभाऊ तात्याबा तापकीर, शांताराम आप्पा बबनराव तापकीर, चंद्रकांत पंढरीनाथ तापकीर, भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब मोळक, शहाजी तापकीर, बाळासाहेब किसन तापकीर, ज्ञानेश्वर राणू तापकीर आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे सुद्धा यावेळी उपस्थित होते.




