वाळंज माध्यमिक विद्यालय व जि प केंद्र शाळा आंबवणे या ठिकाणी भव्य संगणक कक्षा चे उदघाटन










मावळ मराठा न्युज – आंबावणे,वाळंज माध्यमिक विद्यालय व जि प केंद्र शाळा आंबवणे या ठिकाणी भव्य संगणक कक्षा चे उदघाटन अवसर फाउंडेशन बंगलोर यांच्या वतीने सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबवणे प्रत्येकी 15 लक्ष रुपये खर्चाचे अत्याधुनिक संगणक दालन तयार करून 15 संगणक या प्रमाणे दोन्ही शाळेत भव्य संगणक लॅब तयार करून मिळाली.या उदघाटन सोहळ्यास मा. आनंद चतुरवेदी व्यवस्थापकीय संचालक अवसर फाउंडेशन बंगलोर,मा दुर्गाप्रसाद सर संचालक अवसर फाउंडेशन, मा. नंदकुमार वाळंज संस्थापक अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था आंबवणे मा. कोमलताई फाटक सरपंच आंबवणे,मा आशिष सावरगावकर मा. सुनीता पालवे मॅडम मा. उदय भोसले ब्रँच मॅनेजर पुणे मा. निलेश मेंगडे मा. उपसरपंच आंबवणे,मा नारायण दळवी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मा.मनोज जंगम अध्यक्ष शिक्षक पालक संघ,मा.गणेश दळवी पोलीस पाटील आंबवणे, मा. उल्हास मानकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,मा रविराज सर मा. नंदकिशोर सर अरुणभाऊ काकडे, यशवंत माताळे, मारुती तोंडे, मुख्याध्यापक देवरे सर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रथम दीप प्रज्वलन करून संगणक कक्षा चे उदघाट्न करण्यात आले. मान्यवरांचा यथोचित सन्मान केला. मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी प्रास्ताविक करतांना सदर सुविधे चा विद्यार्थ्यांना पुरेपूर उपयोग होईल याची हमी दिली.सोहम जंगम व प्रणिता खेडकर या विद्यार्थ्यांनी मनोगतातून संस्थेचे आभार मानले.*अवसर संस्थेची वैशिष्ट्य *वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व संधी उपलब्ध करणे. सामाजिक व आर्थिक उन्नती करणे यासाठी 2012 पासून अवसर फाउंडेशन भारतभर कार्यरत आहे.विद्यार्थ्यांना दीर्घाकाळ शिष्यवृत्ती देणे,आजपर्यंत 65 संगणक प्रयोगशाळा उभारून 800 पेक्षा जास्त संगणक पुरवले आहेत. 30 हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. त्या बरोबर कौशल्य विकास कार्यक्रम राबवून 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पुर्णवेळ रोजगार उपलब्ध करून दिला आहे.थोडक्यात “क्षमताना संधीशी जोडणे ” हा उदात्त विचार घेऊन अवसर कार्य करत आहे.आनंद चतुर्वेदि यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या करत असलेल्या कामाची ओळख करून दिली, कोमलताई फाटक यांनी अवसर संस्थेचे विशेष आभार मानले. शाळेचे सर्व्हे सर्व्हा मा नंदकुमार वाळंज यांनी आपल्या मनोगतात अवसर ने दिलेल्या संधीचे आमचे विद्यार्थी नक्कीच सोन करतील अशी ग्वाही दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कुलथे यांनी करून समारोपचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज जंगम,रवींद्र सोनवणे, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, रविराज सर,जसवंत भाई, संतोष दळवी, महादेव खेडकर, मंदा दळवी, रवी वायरमन यांनी परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



