लोणावळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. विलास पाटील

मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,डॉ. विलास पाटील सहयोगी प्राध्यापक (वनस्पती शास्त्र) यांची लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला व श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. रमेशचंद्र नय्यर, सचिव मा. दत्तात्रय पाळेकर, विश्वस्त व सल्लागार अ‍ॅड. नीलिमा खिरे, विश्वस्त दत्तात्रय येवले, माझी प्रभारी प्राचार्य डॉ. दिगंबर दरेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. विलास पाटील यांचे अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य पदी नेमणूक झाल्याने डॉ. पाटील यांचेवर समाजातील अनेक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ. विलास पाटील यांनी पुणे विद्यापीठाची Ph.D पदवी प्राप्त केली आहे. गेले ३० वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. उपप्राचार्य म्हणून १२ वर्षाचा अनुभव आहे. पदवीच्या विज्ञान विध्यार्थ्यांसाठी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली आहेत तसेच अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित आहेत.. Ph.D विध्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून पुणे विद्यापीठाकडून मान्यता. काव्यामित्र संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार. तसेच भारत सरकारचे एक पेटंट मिळवले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सेमिनार मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून गौरव.मावळ मराठा न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page