जागतिक महिला दिनानिमित्त विजया डायग्नोस्टिक सेंटर व तळेगाव लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने- रक्तदान आणि गर्भवती स्त्रियांसाठी विशेष शिबिर संपन्न

मावळ मराठा न्यूज :- तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांच स्वागत केल. त्यानंतर अध्यक्षांनी- एक नारी विविध नात्याने मनुष्य जीवन कस समृद्ध करते असे मनोगतात व्यक्त केले.प्रास्ताविकात ज्येष्ठ लायन डॉ. शाळीग्राम भंडारी रक्तदान जे सर्वात श्रेष्ठदान दुसरा भाग म्हणजे-गर्भवती मातेने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी त्याबरोबरच सोनोग्राफीच्या माध्यमातून आपलं होणार बाळ आरोग्य संपन्न आहे किंवा नाही? याची माहिती यावेळी देण्यात आली. विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या रेडिओलॉजिस्ट डॉ. दिपाली झंवर यांनी गर्भवती स्त्रियांच्या दृष्टीने सोनोग्राफीचे किती महत्त्व आहे हे सांगितलं. गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यातच जन्माला येणाऱ्या अर्भकाच्या बौद्धिक आणि शारीरिक व्यंगाची पूर्ण कल्पना या सोनोग्राफीत आपल्याला येऊ शकते. एवढेच नव्हे तर नैसर्गिक किंवा आवश्यक शस्त्रक्रिये शिवाय आपण डिलिव्हरी करू शकतो का? याचा निर्णय सोनोग्राफीच्या रिपोर्टद्वारा आपण घेऊ शकतो. आपण स्वतः आणि इतरांनाही गर्भलिंग परीक्षा कधीच करू देणार नाही ही शपथ उपस्थित महिलांना डॉक्टर दिपालींनी आपल्या मनोगतात दिली. गर्भवती स्त्रिया आणि स्त्रियांच्या विविध आजारात फिजिओथेरपी या क्षेत्रात उच्चपदवी संपन्न केलेल्या- डॉक्टर गिरीजा पाठक मोघे यांनी गर्भवती स्त्रियांनी करावयाचे व्यायाम आणि घ्यावयाचा आहार यावर अत्यंत मौलिक विचार प्रात्यक्षिकासह व्यक्त केलेत. लायन् राधेश्याम भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. पिंपरी चिंचवड ब्लडबँकेचे युवराज बडगुजर यांनी उपस्थितांना आवाहन केल्यानंतर एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने रक्तदानशिबिर हेही खऱ्याअर्थाने यशस्वी झाले. लायन अनिता बाळसराफ यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page