लोणावळा महाविद्यालयात आयएनएस शिवाजी व लोणावळा नगरपालिकेच्या वतीने नौसेना मधील उपलब्ध संधी या विषयावर कार्यशाळा

मावळ मराठा न्युज – लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लोणावळा नगरपरिषद आणि आई.एन.एस. शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुलै रोजी लोणावळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “नौसेना (नेव्ही) मधील उपलब्ध संधी “या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.दत्तात्रय पाळेकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांच्या उपस्थितीत झाले. आय एन एस शिवाजी तर्फे लेफ्टनंट कमांडर श्री विष्णू यांच्या मार्गदर्शनाखाली सब लेफ्टनंट नताशा आणि सब लेफ्टनंट अंशुल यांनी विद्यांर्थ्यांसमोर नेव्ही मधील विविध संधी, प्रवेशाकरिता लागणारी पात्रता, नेव्हीचे देशासाठी असणारे अमूल्य असे योगदान, अग्निविर या योजनेकरिताची पात्रता इतर अनेक महत्वाच्या विषयांची उत्कृष्ट अशी माहिती दिली. सब लफ्टनंट कौशिक आणि सब लेफ्टनंट प्रशांत यांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कमांडर विष्णू चंद्रन यांनी सुद्धा नेव्हीमुळे होणारे आयुष्यातील सकारात्मक बदल, नौदल कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि नौदलातील विविध क्षेत्रातील संधी यांबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी केली. सदर कार्यक्रमास लोणावळा एजुकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्ता पाळेकर, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री अशोक साबळे व श्री कुलकर्णी, विद्यार्थी, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका भक्ती अहिर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन समन्वयक डॉ. सुपोर्णा मित्रा यांनी केले. प्राध्यापिका डॉ. रंजू बाला यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page