चिखलीच्या अकॅडेमिक हाइट्स पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल

मावळ मराठा न्युज :-चिखली(प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या घेतलेल्या २०२३-२४ दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यावेळी चिखली येथील अकॅडेमिक हाइट्स पब्लिक स्कूलमधील परीक्षेला बसलेले शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. परीक्षेला एकूण २८ विद्यार्थी बसले होते. दहावीतील अपूर्वा दरेकर हिला ९८.८० टक्के गुण मिळवून ती विद्यालयामध्ये प्रथम आली आहे. आदित्य बलावडे (९७ .२०),ईश्वरी राऊत (९५.८० ),श्रेया तिवारी (९५ .८०) हे सर्व अव्वल ठरलेले विद्यार्थी आहेत. अपूर्वा दरेकर हिला गणित आणि इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत . विद्यालयातील एकूण १२ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण मिळाले आहेत ,तर ८० टक्के विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अकॅडेमिक हाइट्स पब्लिक स्कूल चिखली च्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी आणि सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून अभ्यास कसा करता येईल याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि याचे फलस्वरूप आज विद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे. याचे श्रेय मुख्याध्यापिक यांनी संस्थापक दिलीप तिलवाणी व संचालक मुकेश तिलवाणी,सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेले आहे. संस्थापक दिलीप तिलवाणी व संचालक मुकेश तिलवाणी यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page