*Bollywood Hits – हा संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.*








मावळ मराठा न्युज -लोणावळा,शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी महिला मंडळ सभागृहात, मेहता म्युझिकल आयोजित बॉलिवूड हिट्स हा स्थानिक कलाकारांनी सादर केलेला संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध गायकांनी नवी – जुनी हिंदी गाणी सुंदर प्रकारे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात LED स्क्रीन वर गाण्यासोबत चित्रपटातील मूळ गाणे दाखवण्यात आल्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला, व कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत रसिक खिळून राहिले. या वेळी गायक व आयोजक श्री राजेश मेहता, व अन्य गायक आर्या बांदल, संतोषी बांदल, मनोज कराळे, मनश्री कराळे, नीता शाह, अशोक साळवे, पांडुरंग तीखे, बीना राईलकर, अशोक गुगळे, जया गोडबोले, बनवारीलाल गुप्ता, सुरेश पिसे, गुरुप्रसाद वासकर, मंगला राणे, ज्योती रांगणे, अमोल वाडेकर, यांनी एकाहून एक सुंदर गीते सादर केली. या वेळी कुमारी आर्या बांदल हिने सॅक्सोफोन या वाद्यावर गीते सादर केली. सौ उमा मेहता यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात लोणावळ्याचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनावणे, भगवान आंबेकर, रामदास दरेकर, धीरूभाई कल्याणजी, चंद्रकांत जोशी, बाबूलाल तारे, पत्रकार संतोषी तोंडे, माणिक गांधी, राजकुमार गोयल, मृदुला पाटील, वसुधा पाटील, विशाखा गोळपकर, रश्मी शिरस्कर, सुचित्रा चांदोरकर, शोभा दिघे, प्रमोद बंसल, दिलीप पवार, राजेंद्र दिवेकर, एलिझाबेथ वाळंज, किरण स्वामी, हेमंत पाटेकर, प्राची पाटेकर, विवेक घाणेकर, उषा बोरास्कर , डॉ ममता काळे, मिनाक्षी गायकवाड, मनोज कदम, कृतिका कदम, वैशाली साखरेकर, धनंजय साखरेकर, व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आला व भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.



