निदान लॉस्केपचे उद्घाटन निदान लीगल एड फोरमचें नवे कायदेविषयक वर्तमानपत्र








मावळ मराठा न्युज -मुंबई, निदान लीगल एड फोरम तर्फे त्यांच्या नव्या कायदेविषयक “निदान लॉस्केप” या प्रकाशनाचे भव्य उद्घाटन दिनांक २० .१२ .२०२५ रोजी नॅशनल लॉ युनिव्हर्सीटी पवई, मुंबई येथे करण्यात आले. कायदेविषयक जनजागृती वाढवणे आणि शासन व जनते दरम्यान सशक्त संवादाचा पूल उभारणे हा या प्रकाशनाचा प्रमुख उद्देश आहे.या प्रकाशनाचे उद्घाटन अत्यंत दिमाखात संपन्न झालेः यावेळी मा.न्यायमूर्ती सौ. भारती डांगरे,मुंबई उच्च न्यायालय यांच्या हस्ते,तर अॅड मिलिंद साठे,अॅडव्होकेट जनरल, महाराष्ट्र अॅड पूनम कंधारीया,सरकारी वकील, महाराष्ट्र या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.उद्घाटनानंतर कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी “लोकशाहीतील माध्यमांची भूमिका” या विषयावर विशेष पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली. कायदा, पत्रकारिता आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला. पॅनेलमध्ये डॉ. किशू देसवानी,श्री. विवेक अग्रवाल, वरिष्ठ गुन्हेवार्ता पत्रकार,अधिवक्ता आशिष मेहता,श्री. रजत श्रीवास्तव, जनरल कौन्सेल, CDSLअधिवक्ता लक्ष्मीकांत सातळेकरया प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.या सर्व मान्यवरांच्या विचारांनी माध्यम नैतिकता, लोकशाहीतील जबाबदाऱ्या आणि चौथ्या स्तंभाची बदलती भूमिका यावर सखोल व समृद्ध चर्चा घडून आली,अॅड तनू मेहता या निदान लॉस्केपच्या मुख्य संपादक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकाशन नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी विश्वासार्ह, सुलभ आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कायदेविषयक माहिती उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. या प्रकाशनाच्या उदघाट्नाला कायदा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आशीर्वाद आणि शुभेछया दिल्या. यात तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचाही समावेश आहे.त्यांनी निदान टीम ला मनःपूरक शुभेच्छा दिल्या.



