देवले येथील निसर्ग शिक्षण ग्राम अनाथालयात व्हॅसलीन डब्यांचे वाटप

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे थंडीही खूप पडली, त्याबरोबर थंड बोचरे वारेही होते .याचा परिणाम म्हणजे अंग तडतडते व त्वचा त्वचेवर भेगा पडतात. मोकळ्या हवेत राहणाऱ्यांना हा त्रास जास्त होतो .लोणावळ्या जवळ असणाऱ्या देवले गावात निसर्ग शिक्षण ग्राम नावाचे अनाथाश्रम आहे, त्यात राहणाऱ्या अनाथ मुलांना थंडीचा खूप त्रास होतो व अंग फुटते. त्यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ लोणावळा ने गेल्या वर्षीपासून थंडीपासून त्वचेच्या संरक्षणासाठी व्हॅसलीन बाटल्यांचे वाटप या आश्रमात करण्यात आले .यावर्षीही रविवार दिनांक ११ जानेवारी २६ रोजी जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना या बाटल्यांचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी रोटरीच्या अध्यक्षा सौ विजया कल्याण, रोटेरियन तसलीम पास्ट. प्रेसिडेंट नितीन कल्याण पास्ट प्रेसिडेंट जयवंत नलोदे व पास्ट प्रेसिडेंट रवींद्र कुलकर्णी ,तसेच शाळेचे पर्यवेक्षक अल्हाद सर उपस्थित होते. सरांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page