श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट,व नगरसेवक मुबिन इनामदार यांच्या विद्यमाने दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा ३ जूनला गुणगौरव आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा







मावळ मराठा न्युज -लोणावळा, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, लोणावळा आणि नगरसेवक मुबिनभाई इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने, १० वी आणि १२ वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम ३ जून २०२६ बुधवार रोजी सायंकाळी ४:०० वाजता,चंद्रलोक हॉटेल गवळी वाडा जवळ, लोणावळा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लोणावळ्याचे माजी नगरसेवक आणि संस्थापक अध्यक्ष, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री नितीन अग्रवाल आणि नगरसेवक मुबिनभाई इनामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांला ७५% टक्के गुणा पेक्षा जास्त असावे तसेच त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अश्या विदयार्थ्यांना ही विशेष शिष्यवृत्ती मिळणार आहे. गरीब आणि हुशार विदयार्थ्यांचे शिक्षण फक्त पैशांअभावी थांबू नये.त्याला शिक्षण घेता यावे हा या शिष्यवृतीचा आणि कार्यक्रमाचा उद्देश आहे.या कार्यक्रमासाठी मावळचे लोकप्रिय आमदार मा. सुनील अण्णा शेळके उपस्थित राहणार आहेत. श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे अपघातातील शव देशातील कोणत्याही भागात शववाहिनी मार्फत मोफत पोहचविण्याचे सामाजिक कार्य अनेक वर्षे सुरु आहे.त्याच पार्श्व भूमिवर गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या उद्देशाने नितीन अगरवाल आणि मुबीन इनामदार यांनी हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व विदयार्थी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आयोजक यांनी केलं आहे.



