मावळ वार्ता फौंडेशनच्या या रोप्य महोत्सवी वर्षात वर्षभर विविध कार्यक्रम,२६ जानेवारीला जागो हिंदुस्थानी रॅलीचें भव्य आयोजन







मावळ मराठा न्युज – लोणावळा,मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी २०२६ रोजी “जागो हिंदुस्तानी” या कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले आहे. नवीन पिढीत देशाभिमान वृद्धिंगत व्हावा यासाठी मावळ वार्ता फौंडेशन च्या वतीने या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नुकतेच हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यंदा मावळ वार्ता फाउंडेशनचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे व त्या निमित्ताने फौंडेशन वर्षभर विविध सांस्कृतिक,सामाजिक आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे फौंडेशन चें अध्यक्ष डॉ किरण गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोणावळा शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाला प्रसिद्धी व सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निश्चितच संघाचा सिंहाचा वाटा असतो असेही फौंडेशन चें पदाधिकारि यांनी यावेळी सांगितले.यावेळी अध्यक्ष,श्री. किरण गायकवाड,सचिवश्री. नविन भुरट,निमंत्रक,श्री. संजय अडसुळे,कार्यक्रम अध्यक्ष,श्री. बापुलाल तारे,उपाध्यक्ष,विनय विद्वान्स,सरचिटणीस नवीन भुरट,प्रमुख सल्लागार, नंदकुमार वाळुंज उर्फ बाबूजी,सहखजिनदार संदीप वर्तक,सहसेक्रेटरी भरत तिखे,निमंत्रक संजय अडसूळे,सल्लागार जितेंद्र बोत्रे,जितेंद्र टेलर,हेमंत मुळे, ज्ञानेश्वर येवले,बाबुभाई शेख पत्रकार परिषदेला उपस्थित होते.



