लोणावळ्यात आधार स्तंभ दिव्यांग फौंडेशन च्या वतीने रोजगार प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन








मावळ मराठा न्युज – लोणावळा,नवनिर्वाचित नगरसेवक श्री सुमित गवळी आणि सौ स्वप्ना कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळ्यात आधार स्तंभ दिव्यांग फौंडेशन च्या वतीने रोजगार प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.या केंद्रमार्फत अपंग आणि दिव्यांग यांना रोजगाराच्या संधी कश्या कुठे उपलब्ध असणार याबाबत संस्थेच्या अध्यक्षा मयुरी बोत्रे मार्गदर्शन करणार आहेत. या केंद्राचे उदघाटन नुकतेच लोणावळ्यात करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुमित गवळी स्वप्ना कदम यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वोतपरी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाला श्री अतुल कदम श्री लहू गायकवाड श्री गिरीधर पाटणकर कु राजेश कारके, सुधिर पाटणकर,अमोल कदम, मधुर पाटणकर,श्री काशीनाथ मोरे,सौ शैला बोत्रे, श्रीमती उमा, सौ सुमन गायकवड, श्रीमती वैशाली फाटक,सौ निर्मला गायकवाड,सुरेखा हुलावळे,श्रीमती पुष्पा फाटक,सौ स्वाती गायकवाड,काशिकर,दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री सुमित गवळी,श्री विशाल कांबळे आणि मैत्री ग्रुप,श्रीमती मिनाक्षी कुमकर,उमा वाघमारे,सौ शोभना गवस,श्री श्रीपाद महिसकर,श्रीमती अलका बामने,श्री सुखदेव शिंदे,यांनी विशेष मदत केली.संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कु मयुरी बोत्रे, कु तन्वी गायकवाड,श्री कुणाल कालेकर,श्री एस एस अनिलराव,कु दर्शन गायकवाड,संस्थेच्या पदाधिकार्यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.



