साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांची जयंती शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने उत्साहात साजरी



मावळ मराठा न्युज:- निगडी,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांची जयंती शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील स्मारकास संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डी पी खंडाळे, रामदास कांबळे, आण्णासाहेब कसबे,छावा संघटनेचे सचिन आण्णा लिमकर, मच्छिंद्र चिंचोळे, राहुल शिर्के,शुभम बिराजदार, छावाचे कांबळे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




