अटल सेतूच्या प्रथम वर्धापन दिनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी अटल सेतूचे प्रथम प्रवासी मदन पवार कुटुंबीयांना केक कापण्याचा दिला सन्मान




मावळ मराठा न्युज -मुंबई, १२ जानेवारी २०२५ भारतातील सर्वात लांब सागरी पूल ‘ अटल सेतूच्या ‘ लोकार्पणाच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अटल सेतूच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेले अटल सेतूचे प्रथम प्रवासी म्हणून सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील पेठ गावचे सुपुत्र, ज्येष्ठ समाजसेवक, से.नि. कस्टम ऑफिसर श्री मदन पवार यांना सेलिब्रिटी म्हणून निमंत्रित करण्यात आले. अटल सेतू प्रकल्पाचे व्हाइस प्रेसिडेंट श्री कैलाश गनात्रा ज्यांनी १२ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री मदन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भव्य स्वागत केले त्यांनीच आज मदन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करून खास डिझाईन केलेला केक कापण्याचा सन्मान मदन पवार आणि यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ शीला आणि नात सीनोरा त्यांना देण्यात आला.या ऐतिहासिक क्षणांचे कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे..




