लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी देविदास कडू तर स्वीकृत नगरसेवक पदी निखिल कवीश्वर आणि मुकेश परमार यांची निवड








मावळ मराठा न्यूज- लोणावळा, लोणावळा नगरपरिषद पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली उपनगराध्यक्ष पदी भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक देवीदास कडू यांची मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या आदेशा नुसार आणि पक्षीय राजकारण न करता पुन्हा बिनविरोध उपगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी सभागृहात पिठासन अधिकारी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,मुख्याधिकारी अशोक साबळे,आणि नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देविदास कडू उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून आवश्यक असणाऱ्या निकषा बद्दल माहिती दिली तर पिठासन अधिकारी नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी स्वीकृत नगरसेवक निखिल कवीश्वर,मुकेश थानामल परमार यांची अधिकृत घोषणा केली त्यात झांकीर खलि्फा यांची देखील राष्ट्रवादी कडून निवड करण्यात आली परंतु तांत्रिक आणि काही कागद पत्राची पूर्तता न झाल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आल्याचे मुख्याधिकारी साबळे यांनी यावेळी सांगितले. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर सभागृहात शुभेच्छाचा वर्षाव आणि अभिनंदन पर भाषण झाली.यात राष्ट्रवादी चे रवीभाऊ पोटफोडे,माजी नागरासेवक नारायण पाळेकर,बाबा शेट्टीबापू सोनावणे,देविदास कडू निखिल कवीश्वर जीवन गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर लोणावळा शहरात गुलाल आणि फटाक्यांच्या आतशबाजीत मिरवणूक काढण्यात आली.



