शासकीय आयटीआय पिंपरी चिंचवड आयोजित १ जून ला छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर

मावळ मराठा न्यूज,पिंपरी, ३० मे २०२३,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड मार्फत नववी ते पदवीधर अशा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जून २०२३ रोजी भोसरी विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे माननीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता हे शिबिर सुरू होईल. शिबिरामध्ये तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन, सचित्र प्रदर्शन, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती व कर्ज, कलमापन चाचण्या या विषयी माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ,स्वंयरोजगार याबद्दल देखील माहितीचे स्टॉल असणार आहेत. या सर्व शिबिरांना आयएमसीचे अधिकारी श्री शिवाजी चौंडकर, श्री केटी विजयनन ,निशा कारकिरा, कौशल्य विकास चे उपसंचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थी व पालक यांनी तसेच शाळा महाविद्यालय यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय आयटीआय पिंपरी चिंचवडचे प्राचार्य माननीय शशिकांत साबळे यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page