विश्व हिंदू परिषद, बजरंग दल लोणावळा च्या वतीने वैद्यकीय शिबिर










मावळ मराठा न्युज -लोणावळा दि २७ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल लोणावळा प्रखंडच्या वतीने नागनाथ माध्यमिक विद्यालय, मुलांचे वसतिगृह येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुधीर राईलकर,.मंगेश तेलंग,.सुमित येवले,जयवंत देशकर,कुणाल होजगे,वरद वाघ,तेजस राईलकर,ओंकार रोकडे,ओम मानकर,विनीत खळदकर विश्व हिंदू परिषद लोणावळा प्रखंडचे कार्यकर्ते, नागनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, वसतिगृह कर्मचारी तसेच नागरिक यांनी सहकार्य केले.
यावेळी मावळ मुळशी जिल्हा मंत्री .महेंद्र असवले, बजरंग दल जिल्हा संयोजक अमित भेगडे,जिल्हा निधी प्रमुख सचिन शेलार,अनुलोम तालुका प्रमुख बाळासाहेब खांडभोर हे उपस्थित होते.अस्थिरोग तज्ञ डॉ.अमोल रानडे
दंतरोग तज्ञ डॉ.प्रशांत पाठक,नेत्र तज्ञ डॉ.गौरव ढोणे,जनरल फिजिशियन डॉ.
अमोल कालेकर यांनी वैद्यकीय तपासणी केली.



