ऑक्सिलियम कॉन्व्हेंट शाळेची लोणावळा नगरपरिषदच्या सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्लांटला शैक्षणिक भेट

मावळ मराठा न्युज- लोणावळा,दिनांक: १५ जानेवारी २०२६ रोजी ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी लोणावळा नगरपरिषद (LMC) यांच्या वर्सोली, लोणावळा येथील सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्लांट (Solid Waste Processing Plant) ला शैक्षणिक भेट दिली.या भेटीदरम्यान शहरातील ओला व सुका कचरा संकलन, त्यावर केली जाणारी शास्त्रीय प्रक्रिया, तसेच त्या कचऱ्यापासून उपयुक्त कंपोस्ट कसे तयार केले जाते याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरण, स्वच्छता राखणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जबाबदारीने वागण्याची शपथ घेतली.ही भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page