दिनांक १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संविधान गौरव समारंभ प्रचार सभा वळवण,समतानगर येथे संपन्न



मावळ मराठा न्युज -लोणावळा,१६ फेब्रुवारी २०२५ रोजी लोणावळा येथे संविधान गौरव समारंभ आयोजित केला जाणार आहे भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमिताने सर्व धर्मिय संविधान गौरव समारंभ साजरा करण्यात येणार आहे. भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. संविधान अमृत महोत्सव समारंभ दि १६ फेब्रु २०२५ रोजी सर्व धर्मीय, सर्व पक्षीय व सर्व संघटना चा वतीने दत्तात्रय येवले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. यावेळी संविधानाच्या ७५ प्रतिचे वाटप करण्यातयेणार आहे. तेंव्हा सर्वांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने व आपल्या सर्व मित्र परिवार सह उपस्थित रहावे असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे. संविधानची ओळख सर्वसामान्य माणसाला व्हावी जेणे करुन प्रत्येक व्यक्तीला आपल्याला काय अधिकार आहेत? देशाप्रती आपली काय जबाबदारी आहे? एवढे जरी कळले तरी आपला भारत देश खऱ्या अर्थाने बलशाली बनेल.त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी वलवण, समतानगर येथे नुकतीच संविधान गौरव सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेस परिसरातील नागरिकांनी उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.




