टानझानियाच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरची लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाला प्रेरणादायी स्नेहभेट








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांना टानझानिया येथील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनीष चावडा यांची स्नेहभेट लाभली. या विशेष भेटीदरम्यान क्लबच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.क्लबच्या आगळ्यावेगळ्या प्रकल्पांतर्गत श्रद्धा पांजरापोळ (गोशाळा) येथे भेट देण्यात आली. या उपक्रमाचे गव्हर्नर यांनी विशेष कौतुक करत समाजसेवेतील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी तुलादान करून गोमातेला चारा अर्पण केला. तसेच गोबरापासून तयार होणारे प्रकल्प, ब्लॉक्स, पणत्या, पॉट्स तसेच प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरची पाहणी केली. जीवदया प्रकल्पाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले आणि प्रकल्पाचे व्हिडिओ चित्रण केले.ही भेट क्लब सदस्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांत अधिक जोमाने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल, लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन ॲड. प्रफुल लुंकड, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन रोहित थोरात, लायन देवेंद्र नाळेकर, लायन दिपाली गाला तसेच पांजरापोळचे सेवाभावी कार्यकर्ते लायन विरल गाला उपस्थित होते.



