बेकायदेशिररित्या गोमांसची चोरटी वाहतुक करणाऱ्या जुन्नर येथील आरोपी फजल युन्नुस सय्यद यास माननीय न्यायालयाकडून फरार घोषित








मावळ मराठा न्युज -लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु. र. नं. २५६/२५ BNS कलम ३२५, २८१, २३४ (४) महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम ५ सी व ९ अ. MV Act १८४ या गुन्हया मधील पाहीजे असलेला आरोपी नामे (१) फजल युन्नुस सय्यद,डस्टर कार नंबर MH48/S/7063 हीचा मालक. रा. शिपाई मोहल्ला ता. जुन्नर, जि. पुणे. (२) डस्टर कार नंबर MH48/S/7063 यावरील चालक नांव पत्ता माहित नाही. यांच्या विरूध्द भरधाव वेगाने कार चालवुन त्यामध्ये बेकायदेशिर रित्या गोमांसची चोरटी वाहतुक करत असताना अपघात करून अपघाताची खबर न देता घटनास्थळा वरून पळुन जाणे वगैरे बाबत तारीख २८/०६/२०२५ रोजी २३.५८ वाजता. इकडील पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीचा त्यांच्या राहते पत्यावर शोध घेतला असता ते मिळुन आले नसुन सदर ठिकाणी ते वास्तव्यास नाही. त्याअनुषंगाने सदर आरोपी यांच्या विरूध्द मे. वडगांव मावळ कोर्ट यांनी प्रथम स्टेंडींग वारंट व त्यानंतर प्रोकलोमेशन वारंट जारी केले आहे. यातील वरील आरोपी हे मुळचे जुन्नर शहरातील रहीवाशी आहेत. त्याचा बीफचा व्यवसाय आहे. त्याअनुषंगाने ते लोणावळा खंडाळा व आजु बाजुच्या परिसरात वेष बदलुन व्यवसाया करता वास्तव्य व चोरून ये जा करत असतात अशी खात्रीलायक गोपनीय बातमी आहे. त्याप्रमाणे आरोपी यांच्या बद्दल कोणास काही माहित असल्यास त्याबाबतची माहिती ही लोणावळा शहर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमाक. ०२११४/२७३०३३ यावर तसेच सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. सुर्यकांत वाणी यांचा मोबाईल नंबर ७५८८९९७७११ यावर तसेच या नंबर कळविणेस विनंती आहे. माहिती देणाराचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.



