मावळ एकता कलामंच आयोजित १२ ऑक्टोबर,२०२५ ला खुल्या काव्य स्पर्धांचे आयोजन

‘मावळ एकता कलामंच’ आयोजित २ ऱ्या वर्धापनदिन निमित्त दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक एकलोणावळा शहर पोलीस स्टेशन समोर काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी,दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कविता पाठवाव्यात,असे आवाहन मावळएकता कला मंच चें अध्यक्ष ऍड.संजय पाटील यांनी केले आहे. सदर स्पर्धा प्रत्यक्ष सादरीकरण करून घेण्यात येईल. स्पर्धेसाठी इच्छुक कवीने आपली एक कविता शिल्पा येवले(विश्वस्त) यांच्या व्हॉट्सअप क्रमांक ९५२९८४५४८७ वर टाईप करून पाठवायची आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नियमावलीचे पालन करावे.१) कवितेला विषयाचे बंधन नाही. २) कविता किमान १२ ते कमाल २० ओळीपर्यंत असावी. यापेक्षा दीर्घ असू नये. ३) सुरुवातीला ‘मावळ एकता कला मंच’ आयोजित काव्य स्पर्धा २ साठी’ असा उल्लेख करावा. कवितेचे शीर्षक,कविता,त्याखाली संपूर्ण नाव,आपला परिसर आणि संपर्क क्रमांक टाईप करावा. ४) कवितेमधून राजकीय,सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठल्याही जाती – धर्मावर टीका करणारी कविता नसावी. ५) स्पर्धेला प्रवेशशुल्क रुपये ५० फक्त सादरीकरण वेळी भरणे आवश्यक . ६) कविता स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी येऊन स्वतः सादर करायची आहे. सादरीकरणाचे सुद्धा गुण गृहीत धरले जातील. ७) पारितोषिक प्राप्त कवींना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. ८) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ९) व्हॉट्सअपवर टाईप करून पाठवलेली कविताच स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. (कवितेचा कागदावर लिहून काढलेला फोटो किंवा इतर कुठल्याही स्वरूपात चालणार नाही.) १०) वरील नियमात न बसणाऱ्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ११) ज्यांनी दिलेल्या मुदतीत कविता पाठवलेल्या आहेत त्यांनाच स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page