पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

मावळ मराठा न्युज नेटवर्क -पुणे, दि. १४ मार्च २०२५ :- शासकीय सर्वच खात्यात भ्रष्ट्राचार बोकळला आहे. कोणत्याही क्षेत्रात पैसे दिल्याशिवाय काम न करण्याची प्रशासनाची प्रवृत्ती सलग ४ वर्ष सर्वच ठिकाणी प्रशासन राज चालू आहे.त्यामुळे अधिकाऱ्यावर कोणाचेची नियंत्रण नाही. निदान लोकप्रतिनिधी म्हणून थोडाफार वचक अधिकाऱ्यांवर असायचा.महसूल,पोलीस यात अग्रेसर तर आहेच परंतु ही कीड सर्वत्र पसरलेली दिसते. अण्णा हजारे यांनी याबाबत खूप परिश्रम घेतले,कायदे केले परंतु तरीही प्रशासन त्यातून पळवाटा काढतांना दिसतात. भलगठ्ठा पगार असताना लाच मागणे म्हणजे ते आपला अधिकार समजायला लागले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार , उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे. ‘लाचलुचपत’च्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे‌. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम  १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले. याप्रकरणी एका ५७ वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या २ टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार १ लाख ४२ हजार रूपायांची लाच स्वीकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव यांनी सांगितले. कोणी लाच मागत असेल तर, नागरिकांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावाकोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांचे खासगी दलाल  (एजंट) हे कोणतेही सरकारी काम करून देण्यासा लाचेची मागणी करीत असल्यास, नागरिकांनी याबाबत तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या  खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.संपर्क क्रमांक १)  पुणे दुरध्वनी क्रमांक (०२०) २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३.२) व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक मुंबई :- ९९३०९९७७०३) ई-मेलआयडी पुणे :- dyspacbpune@mahapolice.gov.in४) वेबसाईट :- www.achmaharashtra.gov.in५) ऑनलाईन तक्रार अॅप :- www.achmaharashtra.net.in

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page