एक्सप्रेस हायवे वर लोकांचे जीव वाचवणारे देवदूत यांचे २६ जानेवारीला रास्ता रोको तर २७ जानेवारी पासून देवदूतांचे वृद्ध आईवडिलांचे बेमुदत उपोषण









मावळ मराठा न्युज कुसगाव लोणावळा,दि. २६ जानेवारी २०२६ रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर काम करणाऱ्या (देवदुत) कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात कामगारांचे वृध्द-आई वडिल पत्नी मुले व मावळातील विविध गावातील सामाजिक कार्यकर्ते सभासद यांच्या वतीने २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिनी) लोणावळा येथील कुसगाव हायवेवर रास्ता रोको’ आंदोलन केले जाणार असून त्या नंतर सदर (देवदूत) कामगारांचे वृध्द आई-वडिल पत्नी व मुले ही दि. २७/१/२०२६ पासून बे-मुदत उपोषण कुसगाव ऑफिस जवळ सुरू करणार असून त्यामुळे होणाऱ्या परिणामास M.S.R.D.C/IRB Ltd व आर्यन पॅम्प लि. हे व्यवस्थापन जबाबदार राहतील.यात देवदूत यांच्या मागण्या खालील प्रमाणे -१ . कामगारांना अल्प वेतनावर काम करावे लागत आहे. २. मेडिकल सुविधा अत्यंत अल्प असून त्यात कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे आई-वहिडल पत्नी व मुले यांचा समावेश नाही.३ . १२ तास काम सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सर्व कामगारांकडून एक्सप्रेस हायवेवर करून घेतले असून त्याचा ओव्हर टाईमचा मोबदला दिलेला नाही. फक्त आठ तासाचे वेतन दिलेले आहे.४ . राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायदयानुसार सन २०१५ पासून मिळत नाही. एक्सप्रेस हायवेवर काम करणाऱ्या कामगारांना सेप्टी साधने मिळत नाही. तसेच एक्सप्रेस हायवेवर कामगारांना दिलेल्या क्यु आर व्ही व्हॅन हया सुस्थितीत नाही. त्यातले अनेक यंत्रणा बंद पडलेले असून सदरचे व्हॅन नादुरूस्त असल्याने त्यांचा केव्हाही अपघात होवून त्यात काम करणाऱ्या कामगारांचे जीवन धोक्यात आहे. याबाबत वेळोवेळी उपरोक्त सर्व यंत्रणांना कळवूनही ते कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे येथे काम करणाऱ्या ६० कामगारांचे जीवन धोक्यात असल्याने आपल्या मुलांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे आई-वडिल, पत्नी व मुले व मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय मजदूर संघाचे सभासद यांच्या वतीने सरकारचे, आय.आर.बी. व्यवस्थापन व आर्यन पंम्प व्यवस्थान यांचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मागनि व लोकशाही पध्दतीने दि. २६ जानेवारी २०२६ रोजी रास्ता रोको व दि. २७ जानेवारी २०२६ पासून कामगारांचे वृध्द आई-वडिल पत्नी व मुले बेमुदत उपोषण सकाळी ११ वाजल्यापासून करणार आहे. अशी माहिती भारतीय मजदूर संघांचे चिटणीस,बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.



