मसाप मावळ शाखेच्या अभिवाचन सोहळ्याने रसिकांना मोहवले

मावळ मराठा न्युज -मावळ,साहित्याचा आस्वाद घेताना तो जिवंत स्वरूपात अनुभवता आला, तर त्याची मजा आणखीनच वाढते. महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन सोहळ्यात हा अनुभव रसिकांना मिळाला. अनंतराव चाफेकर सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात कथा आणि संहितांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण झाले.कथांना लाभले दमदार सादरीकरणकार्यक्रमात व.पु. काळे लिखित ‘शोध’, श्रीकृष्ण पुरंदरे लिखित ‘हमारा लल्ला’ आणि योगेश सोमण लिखित ‘संहिता’ या साहित्यकृतींचे अभिवाचन झाले. सौ. सारिका सुतार, हर्षल आल्पे आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांनी आपल्या प्रभावी आवाजाने आणि सादरीकरणाने या कथा जिवंत केल्या.साहित्यविश्वातील मान्यवरांचा सहभागकार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी सुरेश अत्रे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हॉईसओव्हर आर्टिस्ट संजय हिरवे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन खांबेटे उपस्थित होते. तसेच दामिनी पथकाच्या एक सदस्य स्वाती टेमकर. याही उपस्थित होत्या….त्यांनी दामिनी पथकाविषयी माहिती देत वॄध्द आणि एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांना पोलिसांच्या मदतीबद्दल जनजागृती मान्यवरांनी सर्व उपक्रमांचे आणि अभिवाचन कार्यक्रमाचे कौतुक करत, अशा दर्जेदार साहित्य उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादया संध्याकाळी साहित्यातील भावनांचा नवा प्रवास अनुभवायला मिळाला. उत्कृष्ट लेखन, प्रभावी अभिवाचन आणि रसिकांची भरभरून दाद यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. आयोजक आणि सहभागी कलाकारांनी उत्तम समन्वय साधत, रसिकांसाठी एक अविस्मरणीय संधी निर्माण केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page