*पिंपरी चिंचवडचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना कोल्हापुर येथे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित*








मावळ मराठा न्युज दि.०९.०४.२०२६पिंपरी चिंचवडचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना कोल्हापुर येथे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोल्हापुर येथे श्री.शाहु स्मारक भवन हॉल मध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मंथन फाऊँडेशन जिल्हास्तरीय पुरस्कार २०२६ या कार्यक्रमात समाजिक कार्य असलेल्या राज्यातुन आलेल्या ५१ पुरस्कारार्थींना सन्मानीत करण्यात आले.सांस्कृतीक , क्रिडा , कला , शैक्षणिक , धार्मिक , पत्रकारिता , पर्यावरण , राजकिय , आरोग्य , साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणारे यांचा आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याचा आनंद होत असताना ” ज्या समाजात जन्मलो , त्या समाजाचे काही देणे लागतो ” या उदात्त भावनेने कार्य वैशिष्टपुर्ण आणि प्रभावी सेवेमुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळेकासारवाडीचे सुपुत्र *पैलवान काळुराम लांडगे* यांना जिल्हास्तरीय *” आदर्श कर्मयोगी समाजसेवा पुरस्कार २०२६ “* सन्मानीय प्रमुख पाहुणे कोल्हापुर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती *मा.सौ.सारिका यशवंत नांदेकर* व गडहिंग्लज येथील शिवराज विद्यालय व कॉलेजचे संस्थापक *प्रा.किसनराव विठ्ठलराव कुराडे* सर यांच्या शुभहस्ते *सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल* देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी शिवतेज केसरी पैलवान सचिन कदम , कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक अभिजीत खतकर उपस्थित होतेकार्यक्रमाला पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती .कार्यक्रम संपूर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष *श्री.सागर शेळके* व मंथन फाऊँडेशनचे सर्व सदस्य यांनी भरपुर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती गायकवाड व सचिन वाडकर यांनी प्रभावीपणे केले.



